रत्नागिरीसाठी दिलासादायक बातमी; ४३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

0

रत्नागिरी : रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक बातमी असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ४३ व्यक्तींचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले असून त्यामध्ये ३ डॉक्टरांसह जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होेते. तब्बल १०३ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी ४३ अहवाल जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले आहेत. ते सर्व ४३ अहवाल निगेटिव्ह आले असून त्यामध्ये संपर्कात आलेल्या ३ डॉक्टरांचा समावेश आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांचा देखील समावेश आहे. प्रलंबित अहवाल लवकरच प्राप्त होतील, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी सांगितले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:24 AM 14-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here