इतर देशांच्या तुलनेत भारताने लवकर पावलं उचलली : पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

देशात लागू असलेला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. राज्य सरकारांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी उत्तम काम केलं आहे. प्रत्येकानं जबाबदारी ओळखून योगदान दिलं आहे. तसेच अन्य देशांच्या तुलनेत भारताने कसा कोरोना संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला, याचे तुम्ही सहभागी आणि साक्षीदार आहात. भारताने किती लवकर पावलं उचलली हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे. समस्या दिसली की आपण त्यादिशेने पावलं टाकली आहेत, असं त्यांनी सांगितलं. आपण जर वेळीच पावलं उचलली नसती तर भारताची अवस्था काय झाली असती याची कल्पना देखील करणं अशक्य आहे. भारताने समस्या वाढण्याची प्रतिक्षा केली नाही, असंही मोदी म्हणाले.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:34 AM 14-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here