शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज

0

मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे.

ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळावा भरवण्याची तयारी सुरू झाली असून पदाधिकारी, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेही मुंबईतच दसरा मेळावा घेण्यासाठी कंबर कसली आहे. अशातच आता शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
“एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ” असं म्हणत शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा दमदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात शिवसैनिकांना आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा, हिंदवी तोफ पुन्हा ध़डाडणार असं म्हणत बी. के. सी मैदानात सायंकाळी पाच वाजता हा दसरा मेळावा होणार असल्याचं टीझरमध्ये म्हटलं आहे.

शिंदे गटाकडून पोस्टरही प्रसिद्ध
दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहेत. तसेच या मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो ठळकपणे लावण्यात आले आहेत. शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचाही फोटो लावण्यात आला आहे. तसेच आम्ही विचारांचे वारसदार असे या पोस्टरवर लिहून शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना डिवचले आहे. तसेच बाळासाहेब तुमचा वाघ आहे म्हणून हिंदुत्वाला जाग आहे, असा एक बॅनर प्रसिद्ध करत शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून चिमटा काढला आहे.
शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. ठाकरे गटापेक्षा शिंदे गटाचा दसरा मेळावा मोठा व्हावा, त्याठिकाणी गर्दी व्हावी यासाठी शिंदे गटाकडून मुंबईतच दसरा मेळावा घेण्यासाठी कंबर कसली आहे. त्यादृष्टीने दसरा मेळाव्याला गर्दी करण्यासाठी ठाण्यातील माजी नगरसेवकांना सुचना देण्यात आल्या आहेत. यात प्रत्येक नगरसेवकाला किमान पाच बस घेऊन येण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 30/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here