कृषी महाविद्यायातील विद्यार्थ्यांनी दिली गांडूळखत निर्मितीबद्दल माहिती

0

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी महाविद्यालय दापोली विद्यार्थी पुष्कर कुलकर्णी, साहिल जगदाळे, गौरेश चव्हाण, ताहुरा मणियार, संस्कृती पवार यांनी जालगांव येथे गांडूळखत निर्मिती बद्दल माहिती दिली.

गांडूळ खत निर्मिती साठी कोणकोणती प्रक्रिया करावी लागते त्याकरीता लागणाऱ्या काय काय उपलब्ध लागते तसेच त्याची संपूर्ण प्रकिऱ्या कशी असते ह्याचे सखोल मार्गदर्शन केले.

गांडूळखत निर्मितीसाठी कुठल्या जातीचे गांडूळ आवश्यक असते व ते कुठे उपलब्ध होते ह्याची सर्व माहिती विद्यार्थ्यांनी दिली. त्याशिवाय गांडूळ खत कुठे विकावे आणि आपल्या शेतीमध्ये त्याचा कसा योग्य वापर करावा ह्याची माहिती देखील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना केली. या माहितीबद्दल जालगांव ग्रामस्थांनी विद्यार्थांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here