रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून रत्नागिरी पंचायत समितीच्या ९४ ग्रामपंचायतींसाठी १५ हजार मास्कचे वाटप करण्यात आले. त्याचे वितरण जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती महेश उर्फ बाबू म्हाप यांच्या हस्ते गटविकास अधिकारी श्री. जाधव यांना वितरित केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वाघमळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, कृषी अधिकारी आदी अधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:55 AM 15-Apr-20
