नवनीत राणांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, नवरात्रात होणार कारवाई?

0

मुंबई : जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणांना तात्पूरता दिलासा मिळाला आहे. 8 ऑक्टोंबरपर्यंत कोणतीही कारवाई करु नये असे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे नवरात्र महोत्सवात कारवाईची कोणतीही टांगती तलवार नवनीत राणा यांच्यावर नसणार आहे.

जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात राणांच्या विरोधाच अजामिनपात्र वॉरंट होते. यावर कोर्टाने स्पष्टीकरण देत 8 ऑक्टोबरपर्यंत कोणतीही कारवाई करु नये असे आदेश दिले आहेत. सेशन कोर्टाने हा निर्णय दिला आहे. नवनीत राणा ह्या अमरावतीच्या खासदार असून त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत आक्षेप घेण्यात आला होता.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:41 PM 30/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here