‘त्या’ कोरोना पॉझिटिव्ह बाळाच्या उपचारासाठी दहा जणांचे विशेष वैद्यकीय पथक तैनात

0

▪️ आईची पुन्हा नव्याने कोरोना चाचणी होणार

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी : साखरतर येथील सहा महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्यानंतर या बाळावर उपचार करण्यासाठी एक टीम जिल्हा रुग्णालयामध्ये तयार करण्यात आली असून दोन बाल रोग तज्ञ त्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. या बाळावर स्वतंत्र कक्षात उपचार सुरू असून दहा जणांचे वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. बाळाच्या आईची पुन्हा नव्याने कोरोना चाचणी करण्याचा निर्णय सिव्हिल प्रशासनाने घेतला आहे. तालुक्यातील साखरतर येथील दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांच्या कुटुंबातीलच सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. साखरतरमध्ये आढळलेल्या पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा तो नातू आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील तीनजण कोरोनाबाधित झाले आहेत. सहा महिन्यांचे बाळ पॉझिटिव्ह असल्याने जिल्हा रुग्णालयाने बाळाच्या आईलाही कोरोना प्रतिबंधक औषधे सुरु केली आहे. बाळासोबत आईला ठेवणे आवश्यक असल्याने त्यादृष्टीने आवश्यक उपायोजना केल्या जात आहेत. बाळाच्या आईची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी बाळाचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने आईची नव्याने कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here