मुंबई : शिंदे समर्थक आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल धुळ्यात मोठं वक्तव्य केलं आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चंपासिंग थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात येत आहेत, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. शिवसेनेतील बंडानंतर मिलिंद नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संवाद कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणपतीच्या दर्शनासाठी नार्वेकर यांच्या निवासस्थानी गेले होते. या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात येत असल्याचं वक्तव्य केल्यानं त्याची चर्चा सुरु झाली आहे.
यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्ही 50 खोके घेतले असतील, पण ज्या चंपासिंह थापाने बाळासाहेबांची आयुष्यभर सेवा केली. त्यांना अग्नीडाग दिला, तो थापा आमच्याकडे आला, आता मिलिंद नार्वेकर देखील आमच्याकडे येत आहेत, अशी चर्चा सुरू असल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 01/Oct/2022
