लांजा : लांजा एसटी आगारा मार्फत शनिवार दिनांक १ ते मंगळवार दिनांक ४ ऑक्टोबर या कालावधीत श्री नवदुर्गा दर्शन एसटी बस फेरी सोडण्यात येणार आहे.
नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून सोडण्यात येणाऱ्या या विशेष बस फेरी च्या माध्यमातून भाविकांना जिल्ह्यातील नवदुर्गाचे दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. या बसफेरी अंतर्गत आर्यादुर्गा देवी (भालावली), महाकालीदेवी (आडीवरे), महालक्ष्मी (वेत्ये), जाकादेवी (कशेळी), नवलादेवी (पावस), महालक्ष्मी देवी (कोळंबे), भगवती देवी (रत्नदुर्ग), जुगाई देवी (जुगाई), आदिष्टी देवी (शिरगाव), महालक्ष्मी देवी (पोमेंडी) आणि नाचणा देवी (नाचणे) या नवदुर्गा दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे. यासाठी प्रत्येक व्यक्तींसाठी ३०० रुपये प्रवासभाडे ठेवण्यात आले आहे.
या विशेष बस फेरीचा लांजा तालुक्यातील प्रवासी भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी केले आहे .अधिक माहितीसाठी डेपो मॅनेजर संदीप पाटील-९६५७११२५५४, अनिल लांजेकर -९४२३२९७२९७, जयवंत जाधव – ९४२०८१४६४२ यांच्याशी संपर्क साधायचा आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 01/Oct/2022