5G मुळे देशात इंटरनेट क्रांती, मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर : पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

नवी दिल्ली : ‘आज 130 कोटी भारतीयांना 5G च्या रूपाने एक अद्भुत भेट मिळत आहे. 5G नव्या युगाची दार ठोठावत आहे. ही अनेक संधींची सुरुवात आहे. यासाठी मी प्रत्येक भारतीयाचे खूप खूप अभिनंदन करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

HTML tutorial

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशात 5G सेवांचा शुभारंभ करण्यात आला. 1 ऑक्टोबरपासून दिल्लीतील प्रगती मैदानावर 4 दिवसीय इंडिया मोबाइल काँग्रेस कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G सेवेची सुरूवात केली. यावेळी ते बोलत होते.

याअगोदर देशाला बाहेरुन मोबाईल आयात करावे लागत होते, पण आता देश मोबाईल निर्यात करत आहे. जगात भारत मोबाईल निर्मिती करण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आत्मनिर्भर भारताने हे करुन दाखवले आहे, असंही मोदी म्हणाले.

’21 व्या शतकातील भारतासाठी 1 ऑक्टोबर 2022 हा ऐतिहासिक दिवस आहे. 5G तंत्रज्ञान दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणेल. नवा भारत हा फक्त तंत्रज्ञानाचा ग्राहक राहणार नाही, तर त्या तंत्रज्ञानाच्या विकासात आणि अंमलबजावणीत भारत सक्रिय भूमिका बजावेल. भविष्यातील या तंत्रज्ञानात भारताची मोठी भूमिका असेल. 2G, 3G, 4G च्या काळात भारत तंत्रज्ञानासाठी इतर देशांवर अवलंबून होता. पण 5G ने भारताने एक नवा इतिहास रचला आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 01/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here