राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

0

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर येथील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

HTML tutorial

या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. कोल्हे यांच्या आगामी शिवप्रताप गरूडझेप या सिनेमाच्या निमित्ताने ही भेट घेण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चित्रपट आणि महाराष्ट्रातील इतिहासाबाबत चर्चा झाली. त्याचसोबत कोल्हे यांनी गृहमंत्र्यांना चित्रपटाच्या स्क्रिनिंगचं निमंत्रणही दिले आहे.

राष्ट्रवादीचे खासदार अमित शाह यांच्या भेटीला गेल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. परंतु अमोल कोल्हे यांचा चित्रपट ५ ऑक्टोबरला प्रसिद्ध होतोय. त्याआधी ही भेट झाली. अमित शाह यांच्या निवासस्थानी जात अमोल कोल्हे यांनी भेट घेतली. शिवप्रताप गरुडझेप या सिनेमाच्या विशेष स्क्रिनिंगसाठी अमित शाह यांनी यावं अशी विनंती कोल्हे यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यावर अमित शाह यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.

कोल्हे-शाह यांच्या भेटीवरून राजकीय चर्चा
अलीकडेच १३ सप्टेंबरला शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या केंद्रीय मंत्री निरीक्षक म्हणून पोहचल्या होत्या. या मतदारसंघात पुढील खासदार भाजपाचा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. शिंदे गटात सामील झालेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना धक्का देणारं ते विधान होते. या चर्चा सुरू असताना चित्रपटाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांची अमित शाह यांच्यासोबत भेट झाली. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

या भेटीबाबत अमोल कोल्हे म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन शिवप्रताप गरूडझेप सिनेमाची माहिती दिली व दिल्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्पेशल स्क्रीनिंगसाठी वेळ देण्याची विनंती केली. ज्या घटनेने ३५६ वर्षांपूर्वी देशाचे लक्ष वेधून या मातीला स्वाभिमानाची शिकवण दिली, तसेच यानिमित्ताने शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुणे-नाशिक रेल्वे, शिवसंस्कार सृष्टी आणि इंद्रायणी मेडिसिटी संदर्भातही सकारात्मक चर्चा झाली. गृहमंत्र्यांनी बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद त्यांनी मानले. घटनेवर आधारित शिवप्रताप गरूडझेप या सिनेमाने देशाचे लक्ष वेधावे व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशाच्या आणि पर्यायाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा हाच उद्देश असंही कोल्हे यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 01/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here