चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. सुनील तटकरे यांनी येथील राष्ट्रवादीचे माजी आ. रमेश कदम यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे.
सावर्डे येथे झालेल्या पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापने पासून रमेश कदम यांनी आमदार म्हणून पाच वर्षे काम पाहिले. मात्र, त्यानंतर पक्षांतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही काळ शेकाप, काँग्रेस, भाजप या पक्षांमध्ये पक्षांतर केले. मात्र, तेथे न रमल्याने ते पुन्हा राष्ट्रवादीत सामील झाले. आता पक्षाने त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.
या निवडीबद्दल प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील,खा. सुनील तटकरे, आ. शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 01/Oct/2022
