वीज बिल अपडेट करण्याच्या नावाखाली डॉक्टरची ऑनलाईन फसवणूक

0

संगमेश्वर : विज बिल अपडेट केले नाही त्यामुळे वीज कनेक्शन खंडित करण्यात येईल असा व्हाॅट्सअप मेसेज अज्ञात व्यक्तीने कडवई येथील डॉक्टरला केला. आलेल्या लिंक वर अकाउंटची माहिती दिल्याने डॉक्टरांची 24 हजार 799 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात मयुरेश विलास पुरोहित यांनी माहिती दिली असून त्याने दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, 28 सप्टेंबर रोजी दुपारी तीन दरम्यान त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर विज बिल अपडेट न केल्याने वीज कनेक्शन खंडित करण्यात येईल असा व्हाट्सअप वर मेसेज आला होता. हा मेसेज तिने पती मयुरेश यांना फॉरवर्ड केल्यानंतर त्यांनी या नंबर वर कॉल केला असता समोरच्या व्यक्तीने तुमचे वीज बिल अपडेट करण्याकरता मी तुम्हाला लिंक पाठवत आहे असे सांगत दहा रुपये भरण्यास सांगितले म्हणून सदरची लिंक उपयोग करत मयुरेशने दहा हजार भरले त्यानंतर खात्यामधून दहा हजार, 9999 व नंतर 4800 रुपये असे डेबिट झाल्याचे तीन मेसेज आले आणि अकाउंट मधून 24 हजार 799 रुपये डेबिट झाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 01/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here