गरबा नृत्यावरून कोळी, खारवी समाजात वाद

0

दापोली : गरबा नृत्य खेळण्यावरून बुरोंडी येथे कोळी आणि खारवी समाजात जागेवरून वाद उफाळून आला. प्रांताधिकाऱ्यांनी त्यात यशस्वी मध्यस्थी केली.

HTML tutorial

बुरोंडी गावातील कोळी, खारवी या दोन समाजात मंदिरासमोरील पारंपरिक जागेतील नाचण्यावरून गेली २६ वर्षे वाद सुरू आहे. वादामुळे प्रांताधिकाऱ्यांनी तेथे नाचण्याची परवानगी रद्द केली आहे. मात्र गेल्या २८ सप्टेंबर रोजी कोळी बांधव गरबा खेळत असताना खारवी समाजाने त्याला हरकत घेतली. त्यानंतर वाद निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी कोळी बांधवांचे गरबा साहित्य जप्त केले. काहींवर गुन्हेही दाखल केले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थ प्रांताधिकारी कार्यालयावर धडकले होते. कोळी समाजातील महिलांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. प्रांताधिकारी शरद पवार यांनी दोन्ही गटांतील लोकांची समजूत काढून दोन्ही समाजांतील लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी गरबा खेळण्याची परवानगी दिली. दोन्ही समाजातील शिष्टमंडळाची चर्चा करून वादावर तोडगा काढला. त्यामुळे मोठा वाद टळला. दोन्ही समाजाचे समाधान झाल्यानंतर सर्व ग्रामस्थ निघून गेले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:02 PM 01/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here