मिस्त्री हायस्कूल येथे मारहाण झालेल्या ‘त्या’ महिलेवर मिरजेत गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : गुरुवारी सकाळी ११ वाजता मेस्त्री हायस्कूल येथे मुलगा कॅन्सरने आजारी असल्याने आर्थिक मदतीची मागणी करणाऱ्या महिलेवर मिरज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तिच्यावर कलम ४५२, ३७९,३२३, ३२४ भा. दं. वि. अन्वये गुन्हा दाखल असल्याचे शहर पोलिसांच्या निदर्शनास आल्याने तिच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

HTML tutorial

सारिका राहुल धुमाळ (३२, मूळ रा. पंढरपूर, सध्या रा. खेडशी, रत्नागिरी) असे या महिलेचे नाव आहे. गुरुवारी मोईद्दीन महंमद सय्यद यांनी शहर पोलिस ठाण्यात फोन करून एक महिला मेस्त्री हायस्कूलमध्ये संशयितरित्या फिरत असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार शहर पोलिसांनी शाळेत जाऊन तिला आपल्या ताब्यात घेतले.

तिची वैद्यकीय तपासणी केल्यावर पोलिस ठाण्यात आणून तिची चौकशी करत असताना तिच्या गुन्हेगारीचा पूर्व रेकॉर्ड पडताळल्यावर ही बाब दिसून आली म्हणून सारिका धुमाळला बंधनाशिवाय मोकळे सोडल्यास तिच्या हातून चोरी, घरफोडीसारखे या गंभीर स्वरूपाचे मालमत्तेविषयी गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तिच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

रत्नागिरी शहर परिसरात अशा प्रकारचा कोणताही अनुचित प्रकार आपल्या निदर्शनास आल्यास त्याबाबत रत्नागिरी जिल्हा पोलिस कंट्रोल रूम संपर्क क्रं.०२३५२२२२२२२,रत्नागिरी शहर पोलिस ठाणे संपर्क क्र.०२३५२-२२२३३३ व डायल ११२ या क्रमांकावर तत्काळ कळवण्यात यावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाकडून करण्यात आले आहे. शहरामध्ये व परिसरामध्ये मुले पळवणारी कोणतीही टोळी सक्रिय नसल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:19 PM 01/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here