देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. त्याचसोबत गरीबांसाठी दिलासादायक योजनाही बनवण्यात आली आहे. केंद्र सरकार पुढील ३ महिने ८० कोटी गरीबांना प्रत्येक महिन्याकाठी ५ किलो धान्य मोफत देणार आहे. आरोग्य, गृह मंत्रालय आणि भारतीय आरोग्य संशोधन परिषदेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. गृह मंत्रालयाचे प्रवक्त्या पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी सांगितले की, जीवनावश्यक वस्तू आणि सेवा नियंत्रणात आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून जवळपास ८० कोटी लोकांना पुढील तीन महिने त्यांच्या पसंतीनुसार ५ किलो गहू अथवा तांदूळ प्रत्येक महिन्याला मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
