जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून उद्योजक सौरभ मलुष्टे यांना वाढ दिवसानिमित्त अभिष्टचिंतन

0

रत्नागिरी : युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले सौरभ मलुष्टे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून शुभेच्छा देण्यात आल्या. साळवी स्टॉप येथील कार्यालयात सौरभ मलुष्टे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली.

HTML tutorial

युवा उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्या वाढ दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक, कला, क्रिडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंतांनी शनिवारी हजेरी लावली होती. सौरभ मलुष्टे नेहमीच सर्व क्षेत्रात हिरीरीने भाग घेत असतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी असोसिएशनकडून शुभेच्छा देण्यासाठी अध्यक्ष भाई विलणकर, उपाध्यक्ष संतोष कदम, अमित विलणकर, आनंद तापेकर आणि फैयाज खतिब यांनी आज (शनिवारी) साळवी स्टॉप येथील त्यांच्या कार्यालयात पुष्पगुछ देत भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here