कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे उद्या महालक्ष्मी पूजन

0

रत्नागिरी : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे दरवर्षीप्रमाणे नवरात्रौत्सवात महालक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. श्रीमहालक्ष्मी पूजन आणि जागर उत्सवाचे आयोजन आश्विन शुद्ध सप्तमी म्हणजेच रविवार दि. २ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे.

मिरजोळे एमआयडीसीतील किशोर नवाथ्ये यांच्या निवासस्थानी सायंकाळी साडेसात ते रात्री साडेदहा या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. महालक्ष्मी पूजनाचा वसा घेऊ इच्छिणाऱ्या सुवासिनींनी संपर्क साधावा तसेच या कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अनंत आगाशे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here