जसप्रीत बुमराह विश्वचषकात खेळण्याची शक्यता?

0

भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह विश्वचषकात खेळण्याची शक्यता कायम आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनी तसे संकेत दिले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना सौरव गांगुलीनं जसप्रीत बुमराहबाबत आशा कायम आहेत. तो विश्वचषकात खेळू शकतो, असे वक्तव्य केले आहे.

विश्वचषकाला दोन ते तीन आठड्याचा कालावधी राहिला आहे. त्यापूर्वीच जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्याची चर्चा माध्यमात रंगली. बीसीसीआयमधील सुत्रांच्या हवाल्यानं प्रसारमाध्यमांनी जसप्रीत बुमराह विश्वचषकाबाहेर गेल्याचं वृत्त दिलं. पण शुक्रवारी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं या वृत्ताचं खडंन करत बुमराहच्या विश्वचषकात खेळण्याच्या आशा कायम असल्याचे संकेत दिले.

जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर बीसीसीआय लक्ष ठेवून आहे. त्याशिवाय त्याची दुखापत लवकर बरी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

जसप्रीत बुमराह सध्या बेंगळुरुमधील NCA मध्ये फिटनेसवर काम करत आहे. एनसीएमध्ये त्याच्या फिटनेसवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. जसप्रीत बुमराह विश्वचषकात खेळण्याची शक्यता कायम आहे. मेडिकल टीम जसप्रीत बुमराहच्या फिटनेस चाचण्या आणि स्कॅन घेऊन त्यावर काम करत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, आशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह पाच ऑक्टोबर रोजी टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याची शक्यता कमी आहे. पण जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरला तर नंतर ऑस्ट्रेलियामध्ये जाण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 01/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here