संचारबंदीत नियम तोडणाऱ्यांकडून तब्बल 37 लाखाचा दंड वसूल

0

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू असतानाही अनेकजण गाड्या घेऊन फिरत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 22 मार्चपासून 10 एप्रिलपर्यंत 10 हजार 895 वाहनांवर कारवाई करून तब्बल 37 लाख 62 हजार 200 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 22 मार्च रोजी जनता कर्फ़्यूपासून रस्त्यांवर वाहने घेऊन फिरणाऱ्यांवर रत्नागिरी वाहतूक पोलीस कारवाई करत आहेत. गेल्या 20 दिवसात हॅल्मेटशिवाय फिरणाऱ्या 4924 जणांकडून 24 लाख 62 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कागदपत्रे नसलेल्या 2146 जणांवर कारवाई करून 4 लाख 29 हजार 200 दंड वसूल करण्यात आला आहे. सीटबेल्ट न लावणाऱ्या 441 जणांकडून 88 हजार 200 रूपये दंड वसूल करण्यात आला. वाहन परवाना नसलेल्या 157 जणांकडून 78 हजार 500 रूपये, फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या 247 जणांकडून 54 हजार 200 रूपये दंड, विमा नसलेल्या 23 जणांकडून 30 हजार 700 रूपये दंड आणि इतर कारवाईतून 2595 जणांकडून 5 लाख 36 हजार 600 रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here