रत्नागिरी : कोकणातील बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) ई-बिझनेस’ उपक्रम सुरू केला आहे. स्मार्ट फोनमध्ये ई-बिझनेस या अॅपद्वारे हा उपक्रम ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहे.
ग्राहकांच्या मागणीनुसार कोणते उत्पादन कोणत्या बाजारपेठेत पाठवायचे, कोणते विक्रेते अथवा संस्था हा माल विकत घेण्यास तयार आहेत. याची माहिती ‘माविम’ जिल्हा कार्यालयातून संकलित करण्यात आली आहे.