लॉकडाउन संपेर्यंत अर्थात ३ मे पर्यंत विशेष रेल्वे सोडण्याचे कुठलेही नियोजन नसल्याचेही रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. रेल्वे मंत्रालायने म्हटले की, ‘देशभरात सर्व प्रकारची प्रवासी रेल्वे सेवा ३ मे पर्यंत पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. तसेच या दरम्यान विविध शहरांमधील स्थलांतरितांच्या झालेल्या गर्दीला त्यांच्या गावापर्यंत सोडण्यासाठी कोणत्याही विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा विचारही नाही.’ रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:06 PM 15-Apr-20
