स्वीडनच्या स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर

0

मुंबई : नोबेल पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली असून स्वीडनचे शास्त्रज्ञ स्वांते पाबो यांना यंदाच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

लुप्त झालेल्या होमिनिन आणि मानवी उत्क्रांतीमधील जीनोम संबंधित अभ्यासाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

स्वीडनचे स्वांते पाबो हे एक जेनेटिस्ट असून ते मानवी उत्क्रांतीसंबंधी संशोधन करतात. ते पॅलिओजेनेटिक्सच्या संस्थापक शास्त्रज्ञांपैकी एक असून त्यांनी निअॅन्डरथल जीनोमवर मोठ्या प्रमाणात संशोधन केलं आहे. त्यांच्या नावाची घोषणा करताना नोबेल पुरस्कार समितीने म्हटलं आहे की, आपल्या संशोधनातून स्वांते पाबो यांनी असं काही केलं आहे की जे या आधी अशक्य समजलं जायचं. निअॅन्डरथल जीनोमचा क्रम ठरवणे हे त्यांचे मोठं संशोधन आहे. निअॅन्डरथल जीनोम सध्या लुप्त झालं आहे. स्वांते पाबो यांनी होमिनिन डेनिसोवा यासंबंधितही संशोधन केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here