तीन दिवसात एसटीचे ५२ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान

0

रत्नागिरी : मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाले असून, मागील तीन दिवसांत ३ हजार ३०६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या.यामुळे एसटीचे ५२ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न बुडाले. रविवारपासून तीन दिवस बंद होती. चिपळूण-कराड, गुहागरचिपळूण मार्गावरील वाहतूकही बंद होती. रविवारी एसटीच्या ७५२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. एकूण ५७ हजार ३९३ किमी वाहतूक बंद होती. यामुळे १३ लाख ५ हजार रुपयांचे उत्पन्न बुडाले. सोमवारी ११२२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. ६४ हजार ५३३ कि.मी. वाहतूक बंद होती. यामुळे १४ लाख ६७ हजार रुपयांचा फटका एसटीला बसला. मंगळवारी १३१२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, १० हजार २७२४ कि.मी. वाहतूक बंद होती. यामुळे एसटीला २३ लाख ३६ हजार रुपयांचा फटका बसला. तर बुधवारी दुपारपर्यंत १२० फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामुळे १ लाख ५२ हजार रुपयांच उत्पन्न बुडाले. बुधवारी खेड, चिपळूण आगारातून वाहतूक बंद होती.LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here