बेपत्ता विवाहितेचा अखेर मृतदेह सापडला; दोन संशयित चौकशीसाठी ताब्यात

0

रत्नागिरी : शहरात व परिसरात एकामागोमाग एक धक्कदायक घटना उघडकीस येत आहेत. शहरातील खालचा फागर वाठार येथून बेपत्ता झालेल्या ३३ वर्षीय विवाहितेचा मृतदेह आज भगवती किल्ल्यासमोरील एका दरीत सापडल्याने खळबळ उडाली. मृतदेह सडला असल्याने मंगळसूत्र आणि पैजानावरून नातेवाईकांनी तो ओळखला आहे. हि आत्महत्या कि घातपात याबाबत पोलीस कसून तपास करीत असून २ संशयिताना याप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे. खोल दरीत पडलेला हा मृतदेह रॅपलिंग करणाऱ्यांच्या साह्याने बाहेर काढण्यात आला आहे.

HTML tutorial


रितेश घाणेकर (रा. खालचा फगरवठार) यांनी यासंदर्भात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांची पत्नी तन्वी घाणेकर (वय ३३) ही २९ सप्टेंबरला सायंकाळी सव्वा सता वाजण्याच्या सूमारास मी बाजारात जावून येते, उशिर झाला तर जेवण करुन घ्या, असे मुलगी आनंदी हिला सांगुन दुचाकी (क्र.एमएच ०८ एक्स ७११६) घेऊन बाजारात गेल्या. रात्री उशीरपर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत त्या घरी न आल्याने पती रितेश यांनी ३० सप्टेंबरला शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. कालपर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. तन्वी घाणेकर यांची दुचाकी भगवती किल्ल्यानजीक दोन दिवसापूर्वी आढळून आली. त्यानंतर शहर पोलिसांनी त्या परिसरात शोधमोहीम आती घेतली. परंतु पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.
सोमवार सकाळपासूनच भगवती किल्ला, कपल पॉईंट, टकमक पॉईंट, लाईट हाऊस परिसरात समुद्राच्या बाजूने शोध सुरू करण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक विनित चौधरी यांनी दिल्या.

दिवसभर पोलिसांचा शोध सुरू होता. सायंकाळी चार वाजता किल्ल्यासमोरील कपल पॉईंट येथे दुर्गंधी येऊ लागल्याने सुमारे 200 फूट खोल दरीमध्ये जाऊन शोध घेतला. तेव्हा एका महिलेचा मृतदेह त्यांना आढळून आला. मृतदेह तेथून बाहेर येण्यासाठी मार्ग नसल्याने पोलिसांन सायंकाळी माऊंटनर्स असोसिएशन रत्नागिरीच्या रॅपलिंग टीमला पाचारण केले. त्यानंतर रोपच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यासाठी नियोजन करण्यात आले. परंतु अंधार पडल्यामुळे २०० फूट खोलवरचा अन सडलेला मृतदेह वर काढणे कठिण होते. अखेर निरीक्षक चौधरी यांच्या सूचनेवरून सहायक पोलिस निरीक्षक मनोज भोसले, उपनिरीक्षक महाले सहकाऱ्यांसह समुद्र किनाऱ्यावर खाली उतरून पायवाटेने घटनास्थळ पोहचले. मृतदेह प्लास्टिक बॅगेत भरून स्ट्रेचरवरून बाहेर काढण्यात आला. तो विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. ही नेमकी आत्महत्या आहे, की घातपात याबाबत पोलिस तपास करीत आहेत. आत्महत्या असेल तर त्याच्यामागे एवढे गंभीर कारण या होते, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here