मुंबई : देशात वेगाने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसचा आता भारतीय नौसेनेतही शिरकाव झाला आहे. भारतीय नौसेनेतील २१ जवानांना लागण झाली आहे. पश्चिम नौसेना कमानीच्या तटावर असेलल्या लॉजिस्टिक आणि एडमिनिस्ट्रेटिव सपोर्ट बेस INS आंग्रेवर २१ जणांमध्ये कोरोना व्हायरस आढळला आहे. या जवानांना आता नौसेनेच्या रूग्णालयात दाखल केलं आहे. नौसेनेत कोरानाशी संबंधीत हे पहिलं प्रकरण आहे. एकाचवेळी एवढ्या जवानांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्या लोकांची तपासणी केली जात आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:02 AM 18-Apr-20
