कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता मोदी सरकारनं लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवला आहे. त्याचदरम्यान मोदी सरकारनं एक नियमावली बनवली असून, काही गोष्टींना सूट दिली आहे. राष्ट्रीय महामार्गावर २० एप्रिलपासून टोलवसुली करण्यासही केंद्रातील मोदी सरकारनं मान्यता दिली आहे. गृह मंत्रालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आंतरराज्य व बाह्य राज्यात सर्व ट्रक व इतर वस्तू किंवा वाहनांसाठी गृह मंत्रालयाने दिलेली शिथीलता लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर आवश्यक ती कारवाई करावी. त्यादृष्टीने २० एप्रिल २०२० पासून टोलवसुली पुन्हा सुरू केली जाणार आहे.
