लांजा : दोन महिन्यांपासून काजू बागेतील शेतघरामध्ये २७ गोण्यांमध्ये जमा करून ठेवलेली काजू बी चोरणाऱ्या लांजा येथील तीन चोरट्यांना अखेर लांजा पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा अटक केली आहे. या तीनही आरोपींना शुक्रवारी सकाळी लांजा पोलिसांनी दिवाणी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दि.२० एप्रिलपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत कामगार शांताराम रांबाडे यांनी याबाबत लांजा पोलिस स्थानकात मंगळवार दि.१४ एप्रिल रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केल्यावर पोलिसांनी या अज्ञाता चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला गेला. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांतच विनोद कोंडीबा साळंखे (२४. रा. साटवली रोड, लांजा), कुलदीप अनिल मानकर (२५, रा.डावारा वसाहत, लांजा), राजू कृष्णा गोंधळी (२४, रा.करूपवाडी. लांजा) या तीनजणांना गजाआड केले. त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:32 AM 18-Apr-20
