खेड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे; मात्र शासनाला नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. त्यांनी सहकार्य केले तरच ऑरेंज झोनमध्ये असलेला जिल्हा ग्रीन झोनमध्ये येणार आहे. म्हणूनच गरज नसताना घराबाहेर न पडता नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दि. १७ एप्रिल रोजी खेड-दापोलीच्या दौऱ्यावर आलेले उदय सामंत येथील पंचायत समिती सभागृहात पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत व खेडचे आमदार योगेश कदम हे देखील उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:03 PM 18-Apr-20
