वाशिष्ठीच्या दूध संकलन केंद्राचा मालघरमध्ये शुभारंभ

0

चिपळूण : वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्टस् या दुग्धप्रकल्पाअंतर्गत वाशिष्ठी पंचक्रोशी दूध उत्पादक सहकारी संस्था (पिंपळी खुर्द, चिपळूण) या संस्थेच्या मालघर येथील दूध संकलन केंद्राचा आज प्रारंभ झाला.

वाशिष्ठी दुग्धप्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान या प्रकल्पांतर्गत दूध संकलनासाठी ठिकठिकाणी संकलन केंद्रे सुरू करण्याचा प्रकल्पाच्या संचालकांचा मानस आहे. या अंतर्गत पहिल्या दूध संकलन केंद्राचे चिपळूण तालुक्यातील मालघर येथे आज उद्घाटन झाले. परिसरात दूध संकलन केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वाशिष्ठी पंचक्रोशी दूध उत्पादक सहकारी संस्थेला धन्यवाद दिले.

मालघर येथील दूध संकलन केंद्रात गाय आणि म्हैस यांचे प्रत्येकी एक हजार लिटर दूध संकलन करण्याची क्षमता आहे. टप्प्याटप्प्याने ठिकठिकाणी असे दूध संकलन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाशिष्ठी डेअरीसाठी दुधाचा पुरवठा करणे सुकर होणार आहे.

मालघरमधील दूध संकलन केंद्राच्या उद्धघाटनप्रसंगी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्टस् या प्रकल्पाच्या संचालिका सौ. स्वप्ना प्रशांत यादव, महेंद्र खेतले, अविनाश गुडेकर, प्रशांत वाजे, कु. स्वामिनी यादव, प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रदीप मगदूम, तसेच गणपत तटकरे, रमेश ठसाळे, सखाराम किलजे, सुनील वाजे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here