महाराष्ट्र व गोवा राज्य उद्योग वाढीसाठी संयुक्त उपक्रम राबवणार : ना. प्रमोद सावंत

0

इन्व्हेस्ट गोवा परिषदेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स बरोबर सामंजस्य करार

उद्योगात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राच्या व्यापार उद्योग क्षेत्राची शिखर संस्था ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्री अ‍ॅण्ड अग्रिकल्चर’ व गोवा सरकार आणि गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज उद्योग वाढीसाठी संयुक्त उपक्रम राबवतील अशी अपेक्षा गोव्याचे मुख्यमंत्री नामदार प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली
इन्व्हेस्ट गोवा या गुंतवणूक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ च्या वतीने अध्यक्ष ललित गांधी, गोवा चेंबर कॉमर्स इंडस्ट्रीज च्या वतीने अध्यक्ष राल्फ डिसूजा यांनी सामंजस्य करारावर सह्या केल्या व सामंजस्य करारांचे आदान प्रदान केले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू ,गोव्याचे उद्योग मंत्री मावीन गोदीना, गोव्याचे पर्यटन व आयटी उद्योग मंत्री रोहन खुंटे, इन्व्हेस्ट गोवा परिषदेचे निमंत्रक मांगिरिश रायकर आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.


महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आदी विविध राज्यातून मोठ्या संख्येने उद्योजक व गुंतवणूकदार या परिषदेस उपस्थित होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या शतक महोत्सवी शिखर संस्थेतर्फे चेंबरच्या कार्यक्षेत्रातील गोवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज तर्फे बरोबर सामंजस्य करार करून दोन्ही राज्यातील उद्योग वाढीसाठी विविध स्तरावर प्रयत्न करणार असल्याची माहिती देऊन ललित गांधी यांनी गोवा येथे महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने सुविधा केंद्र व कौशल प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा केली. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत. माजी मंत्री सुरेश प्रभू आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गोव्याच्या नवीन उद्योग धोरणाच्या पुस्तिकेचे याप्रसंगी अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या वतीने महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या उद्योगाच्या व नवीन गुंतवणुकीच्या विविध संधींचा एक अहवाल ललित गांधी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत सादर केला. तसेच 2 डिसेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत मुंबई येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारचा उद्योग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय व्यापार उद्योग परिषद आयोजित केल्याची माहिती देऊन गोवा सरकारला त्यात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. गोव्याचे मुख्यमंत्री नामदार डॉ. प्रमोद सावंत यांनी या आमंत्रणाचा स्वीकार केल्याचे सांगितले

मुंबईत संपन्न होणाऱ्या या व्यापार उद्योग परिषदेस देशातील उद्योजकांनी सहभागी व्हावे असे आमंत्रण ललित गांधी यांनी उपस्थित त्यांना याप्रसंगी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here