रत्नागिरी : रत्नागिरीजवळच्या राजिवडा येथील कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रत्नागिरीतील करोनाबाधित चार रुग्णांपैकी राजिवडा येथील रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या अहवालानुसार तो रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. तरीदेखील आणखी एकदा या रुग्णाची कोरोनाची चाचणी करण्यात येईल. दरम्यान, साखरतर येथील दोन महिला आणि एका सहा महिन्याच्या मुलाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:55 AM 20-Apr-20
