फिनोलेक्स अॅकॅडमीची प्लेसमेंट मध्ये उत्कृष्ट कामगिरी

0

रत्नागिरी : कोकण विभागातील अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नोलॉजी, रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांमध्ये प्लेसमेंट मध्ये लक्षणीय कामगिरी केली आहे. या शैक्षणिक वर्षांमध्ये एकूण ३३५ विद्यार्थ्यांची प्लेसमेंट महाविद्यालयाकडून झाली. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा मागील शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मधून एकूण २६६ विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची उत्कृष्ट कामगिरी केली होती.

या शैक्षणिक वर्षात ऑगस्ट २०२१ ते सप्टेंबर २०२२ ह्या अवघ्या २ महिन्यांच्या कालावधीमध्ये विविध अभियांत्रिकी शाखांतील एकूण ५० हुन अधिक विद्यार्थ्यांची प्लेसमेंट देखील अगोदरच झाली आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (टी.सी.एस.) सारख्या आंतरराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनी मध्ये ६५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे या मध्ये मेकॅनिकल विभागातील २२, इलेक्ट्रिकल विभागातील १२ आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागातील ११ विद्यार्थी प्लेस झाले. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये केपजेमिनी मध्ये ३८, इन्फोसिस मध्ये २९, विप्रो मध्ये २७ विद्यार्थ्यांची निवड झाली. याच बरोबर सिमेन्स, फिनोलेक्स, अक्सेंचर, इलेकट्रो मेक, फ्लेक्स, विनती ऑरगॅनिक्स, टेक्निमॉँट सारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये देखील विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली आहे. बायजुझ या कंपनीने मागील वर्षी प्रमाणे या वर्षी देखील सर्वोत्तम १० लाख रुपयाचे पॅकेज विद्यार्थ्यांना देऊ केले.

शिक्षण घेतानाच अधिकाधिक विद्यार्थ्यांना नोकरीची संधी प्राप्त करून देण्यासाठी फिनोलेक्स अॅकॅडमी नेहमीच कटिबद्ध असते. त्यादृष्टीने वर्षभर विद्यार्थ्यांकडून रोजगार कौशल्याचा विकास व्हावा म्हणून कसून सराव करून घेतला जातो. त्याचाच भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी विविध ट्रैनिंग प्रोग्रॅमचे आयोजन केले जाते. त्यामध्ये अँप्टिट्यूड ट्रैनिंग, ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यू, सॉफ्ट स्किल्स ट्रैनिंग, व्यक्तिमत्त्व विकास इत्यादी वर विशेष भर दिला जातो. त्यासाठी इंडस्ट्री एक्स्पर्टस व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिले जाते. मुलांचा सर्वागीण विकास व्हावा म्हणून पहिल्या सेमिस्टर पासून ट्रैनिंग, टेक्निकल सेमिनार, टेक्निकल वर्कशॉप यांचा प्लॅन तयार करून त्यानुसार मुलांवर मेहनत घेतली जाते. महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना सरावासाठी ऑफ लाईन व ऑन लाईन अँप्टिट्यूड टेस्ट घेतल्या जातात तसेच नामांकित अँप्टिट्यूड ट्रेनर्स स्वतः महाविद्यालयामध्ये येऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात. या कॅम्पस रिक्रूटमेंट प्रक्रियेसाठी अॅकॅडमीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट टीमने अथक परिश्रम घेतले. या यशाबद्दल होप फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 08/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here