न्यूयॉर्क : कोरोनामुळे जगातील अनेक देशामध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवरही होताना दिसत आहे. न्यूयॉर्कमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली. २० एप्रिल रोजी कच्च्या तेलाच्या किंमतीत एवढी घसरण झाली की कच्च्या तेलाची किंमत बंद बाटलीतील पाण्यापेक्षाही कमी झाल्याचे पाहायला मिळाले. अमेरिकेत कच्च्या तेलाची किंमत शून्यापेक्षाही कमी म्हणजेच -३७.५६ डॉलर्स प्रति बॅरल इतकी घसरल्याचे सांगण्यात येत आहे. मागणीत घट झाल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याचे म्हटले जात आहे. त्यातच सौदी अरेबिया आणि रशियामध्ये सुरू असलेल्या दर युद्धामुळेही मागणीत घसरण झाली आहे. भारत कच्च्या तेलाची ८० टक्के आयात करतो. तसेच भारताला डॉलर्समध्येच याची रक्कम द्यावी लागते. कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या घसरणीचा फायदा भारताला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
