रेशनिंगवर जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणात पारदर्शकता यावी; मुख्यमंत्र्यांकडे जिल्हा भाजपचे पत्र

0

रत्नागिरी : कोरोनामुळे आलेल्या आरोग्य आणीबाणीमध्ये गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबे होरपळली जात आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा रास्त भाव दुकानांमधून होत नसल्याच्या तक्रारी माझ्याकडे येत आहेत. विशेषतः रेशन दुकानांमध्ये मिळणारे धान्य व अन्य जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे याबाबत पारदर्शकता यावी, असे पत्र भाजपचे आ. रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली. रेशन दुकानातील खरेदी विभागाच्या वेब पोर्टलवर उपलब्ध करून त्यात पारदर्शकता आणावी. रेशन कार्डाची पोर्टेबिलिटी यंत्रणा कार्यान्वित केलेली असतानाही ग्राहकांना धान्य अमान्य करण्याच्या तक्रारी येत असल्याचे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here