रत्नागिरी : जिल्ह्यातील 52 तपासणी अहवाल जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त झाले आहेत. या अहवालानुसार साखरतर येथील दोन्ही महिलांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. यासोबतच कामथे उपजिल्हा रुग्णालयातील 10 रुग्णांचे अहवाल देखील निगेटिव्ह आले आहेत. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील 40 रुग्णांचे तपासणी अहवाल बुधवारी सकाळी प्राप्त झाले हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. यामुळे एकूण प्रलंबित 68 अहवाल आणि पैकी 52 अहवाल आतापर्यंत प्राप्त झाले असून हे सर्व निगेटिव्ह आलेले आहेत. आता केवळ 6 महिन्याच्या बाळाचे रिपोर्ट बाकी असून रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असून अंत्यत दिलासादायक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:44 AM 22-Apr-20
