देवरुखात जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

0

रत्नागिरी : श्री सोळजाई ग्रामदेवी मंदिर, देवरूख, रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा श्री सोळजाई ग्रामदेवी मंदिर, देवरूख, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथे दि. १५ ते १६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

या स्पर्धेत ब्रेक टू फिनीश व ब्लॅक टू फिनीश नोंदविणाऱ्या खेळाडूंना प्रथम फेरीपासून रोख पारितोषिके देण्यात येतील. ही स्पर्धा पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, वयस्कर पुरुष गट (५०वर्षावरील), महिला एकेरी, कुमार गट (१८ वर्षाखालील), कुमारी गट (१८ वर्षाखालील), किशोर गट (१४ वर्षाखालील) व किशोरी गट (१४ वर्षाखालील) अशा ८ गटांत खेळविली जाणार आहे.

ही स्पर्धा अखिल भारतीय कॅरम फेडरेशन (राष्ट्रीय संघटना) व आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनच्या प्रचलित स्पर्धा नियमावलीनुसार खेळविली जाईल. इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका मंगळवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंतच स्पर्धा शुल्कासहित खालील ठिकाणी द्यावयाच्या आहेत. त्यानंतर आलेल्या कोणत्याही प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.

नाव नोंदवण्यासाठी गुहागर – प्रदीप परचुरे, चिपळूण – साईप्रकाश कानिटकर, देवरुख – मोहन हजारे, रत्नागिरी – विनायक जोशी, संगमेश्वर – मनमोहन बेंडके, खेड – योगेश आपटे यांच्यशी संपर्क साधावा.

स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून कॅरमचे राज्यस्तरीय पंच मंदार दळवी व सागर कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धा प्रमुख संतोष दामुष्टे असतील. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेण्याचे आवाहन शरदचंद्र गांधी (अध्यक्ष, श्री सोळजाई ग्रामदेवी मंदिर), प्रदीप भाटकर (अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन) यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 11/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here