रिपाई गुहागर तालुक्याची कार्यकारिणी जाहीर

0

गुहागर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गुहागर तालुका अध्यक्षपदी संदीप कदम तर सरचिटणीसपदी सुनील गमरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ही बैठक गहागर तालक्यातील वरवेली येथे रत्नागिरी जिल्हा प्रवक्ते अनंत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजू कदम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या गुहागर तालुकाध्यक्षपदी संदीप कदम (रानवी) तर सरचिणीसपदी सुनील गमरे (जामसुद), तालुका प्रवक्ता शशिकांत जाधव (वरवेली), उपाध्यक्षपदी सुरेश जाधव (वेळंब), विलास गमरे (परचुरी), चिटणीसपदी दशरथ पवार (असगोली), चंद्रकांत मोहिते (पवारसाखरी), कोषाध्यक्षपदी दीपक गमरे (पालपेणे), संघटकपदी महेंद्र कदम (आबलोली), शंकरराव मोहिते (कोतळुक) तसेच कार्यकारिणी सदस्यपदी दत्ताराम कदम (आबलोली), रिपब्लिकन पक्षाच्या गुहागर तालुका युवक अध्यक्षपदी विजय असगोलकर (असगोली), युवक उपाध्यक्षपदी वैभव जाधव (अडूर), युवक जिल्हा प्रतिनिधी प्रभाकर मोहिते (पालशेत), बेसिक जिल्हा प्रतिनिधी अनंत पवार (शीर), विद्याधर कदम (आबलोली), मारुती मोहिते (पवारसाखरी) आदींचा कार्यकारिणीत समावेश आहे. उर्वरित कार्यकारिणीचा विस्तार केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here