रत्नागिरी : श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे रत्नागिरीतील शंभर गरीब व गरजू कटंबांना अडीच टन अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी, जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा सेवा विधी प्राधिकरणचे अध्यक्ष शहापुरे, जिल्हा न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव अनंत सामंत, रत्नागिरीचे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, सहाय्यक धर्मादाय आयुक्त डी. एम. जे. मलीवाले, तहसीलदार शशिकांत जाधव, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे कार्यकारी अधिकारी विनोद भागवत व उपकार्यकारी अधिकारी राजन बोडेकर, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अशोक कदम, सचिव अॅड. विजय साखळकर, ॲड. ऋषिकेश कवितके, धर्मादाय आयुक्त निरीक्षक महेश ठसाळे, तलाठी बाबू चवंडे, सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक संदीप नार्वेकर, संतोष कुडतडकर, राजेश मोरे, राजेंद्र शेलार आदी उपस्थित होते. सदर छायाचित्रात श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे रत्नागिरी आठवडा बाजार येथील झोपडपट्टीमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना अप्पर जिल्हाधिकारी बेलदार, जिल्हा न्यायाधीश शहापुरे, न्यायाधीश अनंत सामंत, तहसीलदार जाधव, संस्थानचे विनोद भागवत, राजन बोडेकर आदी वाटप करताना दिसत आहेत.
