कुणबी समाजोन्नतीतर्फे भरणेत कार्यक्रम

0

खेड : माजी आमदार, शिक्षणमहर्षी व लोकनेते कै. तु. बा. कदम यांची १२ वी पुण्यतिथी कार्यक्रम व कुणबी समाजोन्नती संघ शाखा खेड ग्रामीणचा १०२ वा वर्धापनदिन भरणे येथील श्री काळकाई देवीच्या मंदिरात झाला.

यावेळी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अमित कदम, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, महेंद्र खसासे, रवींद्र गोवळकर, नवनीत इते, अॅड. शीतल ओकटे, युवाध्यक्ष श्रीकांत कदम, प्रदीप घाणेकर, मुंबई सचिव प्रवीण शिबे आदी उपस्थित होते. माजी सभापती सुरेश उसरे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन प्रदीप घाणेकर यांनी केले. आभार अमित कदम यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here