माझं नाव वापरलं तर रॉयल्टी द्यावी लागेल, बाळासाहेब थोरातांचा शिंदे गटाला मिश्किल टोला

0

मुंबई : निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. यावरुन ठाकरे गटाकडून बाळासाहेब म्हणजे नेमके कोणते? बाळासाहेब थोरात, बाळासाहेब दिग्रस की बाळासाहेब आंबेडकर अशी टीका केली गेली. याबाबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना विचारण्यात आलं असता त्यांनीही शिंदे गटाला मिश्किल टोमणा लगावला आहे. “माझं नाव आणि फोटो वापरणार असतील मला त्यांच्याकडून रॉयल्टी घ्यावी लागेल”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आणि एकच हशा पिकला.

अंधेरीतील पोटनिवडणुकीत काँग्रेसनं ठाकरे गटाला पाठिंबा दिला आहे. याबद्दल उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांचे आभार व्यक्त केल्याची माहिती यावेळी बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसंच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना फोन करुन आभार व्यक्त केल्याचंही थोरात यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळाल्यानंतर नेमके कोणते बाळासाहेब अशी टीका केली जात असून तुमचंही नाव घेतलं जात आहे असं थोरात यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं. त्यावर थोरात आणि उपस्थित नेते हसले. त्यावर थोरातांही मिश्किलपणे माझा फोटो आणि नाव वापरलं तर रॉयल्टी घ्यावी लागेल असं म्हटलं. त्यानंतर एकच हशा पिकला.

“बाळासाहेब थोरातांची शिवसेना असेल आणि माझा फोटो लावला तर रॉयल्टी घ्यावी लागेल. ठीक आहे आता जे काय चाललंय त्याचं आत्मपरिक्षण नागरिकांना करण्याची वेळ आली आहे. लोकशाही आणि आपला देश कसा पुढे जातोय याचं परीक्षण करुन निर्णय घेण्याची काळजी आता नागरिकांनी घ्यायची आहे”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:34 PM 11/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here