रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये परदेशातून आलेल्या 1 हजार 119 व्यक्तिंना होमक्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे. कोरोनाबाधित सहापैकी एकाचा मृत्यू झाला असून, दोघेजण बरे झाले आहे तर तिघांवर उपचार सुरु आहेत. तसेच तिघांपैकी दोघांचे रिपोर्टही निगेटिव्ह आले आहेत. संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्या रुग्णांची संख्याही कमी झाली असून, रत्नागिरी जिल्हा ग्रीन झोनच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी सांगितले.
