घरोघरी वृत्तपत्र वितरणावरील बंदी मागे

0

मुंबई : लॉकडाऊनचा दुसरा टप्पा लागू केल्यानंतर केंद्रानं २० एप्रिलपासून राज्य सरकारला काही क्षेत्रांना कामकाज करण्यास सर्शत परवानगी दिली होती. मात्र, यातून वृत्तपत्रांच्या घरपोच वितरणास परवानगी नाकारण्यात आली होती. यासंदर्भात चर्चा केल्यानंतर राज्य सरकारनं निर्णय बदलला असून, मुंबई, पुणे आणि कोरोनाबाधित कंटेनमेंट झोन वगळून इतर ठिकाणी वृत्तपत्र वितरण करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, वृत्तपत्र वितरण करणाऱ्या व्यक्तींनी हे काम करताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देशही सरकारनं दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here