भगवती किल्ल्यानजिक आत्महत्या करणाऱ्या तन्वी घाणेकर यांच्या मृतदेहाची होणार डीएनए चाचणी

0

रत्नागिरी : रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी आढळलेल्या तन्वी घाणेकर हिच्या मृतदेहाची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांकडून घेण्यात आला आहे.

तन्वी बेपत्ता झाल्यापासून काही दिवसानंतर खोल दरीत तिचा मृतदेह आढळला होता. यावेळी मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृतदेह वरील कपडय़ांच्या आधारे ओळख पटविण्यात आली. मात्र तो मृतदेह तन्वीचाच असल्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

तन्वीच्या आत्महत्येबाबत पोलिसांकडून आता कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात येत आहेत. 3 ऑक्टोबर रोजी तन्वीचा मृतदेह आढळून आला तेव्हा घटनास्थळी तिचे नातेवाईक उपस्थित होते. तो मृतदेह तन्वीचाच असल्याचे नातेवाईकांनी खात्रीपूर्वक सांगितले होते. मात्र मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. परंतु भविष्यात कोणताही प्रश्न उपस्थित करण्यात येऊ नये यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here