रत्नागिरी : मुस्लीम समाजाच्या पवित्र रमजान सणाला लवकरच सुरुवात होत असून, शासनाने दिलेल्या नियमांच्या अधीन राहून घरातच नमाज पडण्याला समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मान्यता दिली असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी सांगितले. मुस्लीम समाजाने घेतलेल्या या निर्णयाचे ना. सामंत यांनी स्वागत केले आहे.
