मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नाने अखेर मरिला डिस्कव्हरी या एका मोठ्या क्रुझ शिपवर महिन्याभरापासून अडकून पडलेल्या १४६ भारतीय खलाशी आणि नाविक यांना मुंबई बंदरावर उतरण्याची परवानगी अखेर मिळाली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी नौकानयन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशी बातचीत केल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी यासंदर्भातील एक आदेश जारी केला. गुरुवारी सकाळपासूनच क्रुझवरील खलाशी आणि कर्मचाऱ्यांना मुंबई बंदरावर उतरवण्यास सुरुवात होईल. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्याचं झपाट्याने वाढतं प्रमाण पाहता या खलाशांची रितसर वैद्यकीय तपासणी होणार आहे. गरज भासल्यास त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी एक इमारतही उपलब्ध करण्यात आली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:30 PM 22-Apr-20
