रत्नागिरीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सहाच

0

रत्नागिरी : शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8 दाखविण्यात येत आहे मात्र ती 6 इतकीच आहे. मुंबईतील 2 रुग्णांनी आपला पत्ता रत्नागिरी दिल्याने राज्यस्तरावर जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत रत्नागिरीतील रुग्णांचा आकडा 8 दाखवला जात होता. अनेक प्रसारमाध्यमांनी देखील 8 आकडा दाखवल्याने असंख्य वाचकांनी रत्नागिरी खबरदार या विश्वसनीय माध्यमाकडे याबाबत विचारणा केली होती. मात्र आता याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे. मुंबईतील कांदिवली वेस्ट भागात राहणारी एक 26 वर्षीय तरुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. प्रत्यक्षात ती 2 वर्षापासून तेथे राहत असली तरी नाव नोंदवताना मुळ पत्ता देवरुख संगमेश्वर असा नोंदला आहे. तसेच २४ वर्षीय तरुण रमाबाई आंबेडकर नगर वरळी येथे 10 वर्षापासून राहतो. तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला त्याचा मुळ पत्ता रत्नागिरी जवळील फुणगुस गावचा नोंदला आहे. या दोन नावांमुळे राज्यस्तरावर जारी आकडेवारीत रत्नागिरीचा आकडा 8 पॉझिटिव्ह दाखवला गेलेला आहे. मात्र, रत्नागिरी जिल्हयात कोरोना बाधितांचा आकडा अधिकृतपणे 6 असाच आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:55 PM 22-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here