ॲस्टर आधार हॉस्पिटल, कोल्हापूर ओपीडी (बाह्यरुग्ण सेवा) करीता शिवश्री हॉस्पिटल, रत्नागिरी सोबत करारबद्ध

0

रत्नागिरी : ॲस्टर आधार हॉस्पिटल, कोल्हापूर ओपीडी (बाह्यरुग्ण सेवा) करीता शिवश्री हॉस्पिटल, रत्नागिरी सोबत नुकतेच करारबद्ध झाले आहेत. यामुळे ॲस्टर आधार हॉस्पिटल, कोल्हापूर येथील विशेषज्ञ डॉक्टरांची सेवा रत्नागिरीमध्ये माफक दरात उपलब्ध असेल.

साधारण सुरुवातीला ८-१० डॉक्टर सेवा देतील. याचा रत्नागिरीतील रुग्णांना चांगला फायदा होईल. कोल्हापूर येथे जाण्याचे हेलपाटे या सेवेमुळे कमी होण्यास मदत होईल.

या करारामुळे रत्नागिरीतील जनतेला एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे, त्याचा रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्कासाठी – श्री प्रल्हाद रसाळ – 7058300200

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 13/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here