चोरीछुप्या मार्गाने जिल्ह्यात येणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करून 28 दिवस क्वॉरंटाईन करणार : ना. उदय सामंत

0

रत्नागिरी : चोरीछुप्या मार्गाने, जंगलातून, रेल्वेमार्गावरून, चोरवाटेने चालत अनेकजण जिल्ह्यात येत आहेत. त्यांच्यावर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई होणार असून त्यांना 28 दिवस क्वॉरंटाईन करण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी सांगितले. तसेच 99 टक्के लोक लॉकडाऊनचे पालन करत आहेत. मात्र एक टक्का लोक रस्त्यावर फिरत आहेत, त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्यामुळे रत्नागिरीतही पुण्यासारखी कारवाई करण्याची वेळ येईल, असा इशारा त्यांनी दिला. सामंत म्हणाले की, आपण मंगळवारी लांजा येथून येत असताना रस्त्यावर प्रचंड गर्दी दिसली. चौकशी केली असता व्यापाऱ्यांच्या एका संघटनेने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता. आमची सर्व दुकाने सुरु करा, अशी मागणी केली. हे कृत्य योग्य नाही. सध्या सर्वच थरातील लोकांना आर्थिक फटका बसला आहे. अशावेळी सर्वांनी नियमांचे पालन करावे, अशी विनंती सामंत यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here