गरजूंना मध्यवर्ती वितरण प्रणालीतून मोफत शिधावाटप

0

रत्नागिरी : कोरोनाप्रतिबंधक लॉकडाउनमध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासन, दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मध्यवर्ती वितरण प्रणालीच्या माध्यमातून मोफत शिधावाटप करण्यात येणार आहे. यामुळे लॉकडाउनच्या नियमांचेही पालन करण्यास मदत होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. शिधावाटप करताना लॉकडाउन कालावधीमध्ये कोणत्याही संस्थेच्या सदस्यांना किंवा प्रतिनिधींना, नागरिकांना मोफत वस्तू वाटपाचे कारण देऊन सतत घराबाहेर पडावे लागू नये. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा भंग होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here